कार्तिक यात्रा सुरू झाल्यावर सलग 12 दिवस मंदिरात 24 तास दर्शन सुरू असल्याने विठ्ठलाला थकवा न येण्यासाठी पाठीला लोड लावण्यात आला होता. याकाळात देवाचे सर्व नित्योपचार बंद होते. ते आज पूर्ववत करण्यात आले. अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे.