जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.वेगवेगळ्या जनजागृतीचे फलक हातात घेत कर्मचारी तसेच नागरिक जनजागृती रॅली सहभागी झाले. मतदार जनजागृती रॅलीत महिलांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. रॅलीद्वारे मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.