वाशिम जिल्ह्यात मतदार यादी निरीक्षणाचं काम मोठ्या गतीने सुरू असून ठिकठिकाणी बीएलओ मार्फत मतदारांची नावे तपासणे, दुरुस्ती करणे आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मतदारांनी आणलेल्या कागदपत्रांची पाहणी करून नाव नोंदणी, पत्ता बदल, तसेच इतर त्रुटी दुरुस्त करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. त्याच अनुषंगाने शिरपूर येथे बीएलओ मतदारांकडून आणलेल्या कागदपत्रांची तपासणी करत मतदार यादीचे निरीक्षण करत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी वेळेत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे...