ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. पहाटेपासूनच कल्याण डोंबिवली परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळली. २१ जागांपैकी ९ जागा बिनविरोध झाल्यानंतर, आता उर्वरित १२ जागांसाठी 'सहकार पॅनल' आणि 'परिवर्तन पॅनल' यांच्यात थेट लढत रंगली आहे.