शिरूर तालुक्यातील वाघाळे गावात बिबट्याचा कहर सुरू आहे. पहाटे ३ वाजता एका पोल्ट्री फार्मवर हल्ला करत बिबट्याने पाळीव कुत्रा पळवला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाघाळे परिसरात रोज बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.