वर्ध्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या संकल्पनेतून 'माझे शहर, माझी जबाबदारी' हे स्वच्छता अभियान सुरू झाले आहे. या मोहिमेत नगराध्यक्ष, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, सर्वपक्षीय नगरसेवक आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. मुख्य रस्त्यांबरोबरच वॉर्डांमध्येही ही मोहीम राबवली जाईल. नागरिकांनी स्वच्छ वर्धासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.