वर्धा - हिंगणघाट येथे ऑटोमोबाईल दुरुस्तीच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील साहित्य आणि वाहन दुरुस्तीचे साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगरपरिषद हिंगणघाटआणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमन दलाने आगीवर तातडीने नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अस्पष्ट असून घटनेत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.