वर्धा जिल्ह्यातील केळझर येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांनी गणपतीचा अभिषेक, पूजा आणि आरती केली. भजन-कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त दोन दिवसीय यात्रा महोत्सवही उत्साहात साजरा झाला.