वर्धा जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजता सुरू झाली आहे. जिल्हा क्रीडा संकुलात निकालाची प्रक्रिया पार पडत आहे. या नगरपरिषदांवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, ती कायम राखण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. मतदारांच्या कौलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.