वर्ध्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी पुरवठा पाइपलाइन फुटली. येळाकेळी ते पिपरीदरम्यान अचानक पाइपलाइन फुटल्याने पाण्याचे उंच फवारे उडाले. 11 गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळतात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून पाणी बंद करत दुरुस्तीचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. लवकरच दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.