रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याची बाजारपेठ विविध प्रकारच्या राख्यांनी सजली आहे. बाजारात विविध आकर्षक डिझाईन, रंग आणि आकारांच्या राख्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. चिमुकल्यांसाठी कार्टून कॅरेक्टरच्या राख्यांना विशेष मागणी आहे. पारंपरिक राख्यांसोबतच फॅन्सी आणि आधुनिक राख्यांचेही विविध पर्याय उपलब्ध आहेत. लाडक्या भावाकरीता राखी खरेदी करण्यासाठी बहिणींची बाजारपेठेत लगबग सुरु आहे.