हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती करण्यात आली. एवोनीत स्टील कंपनी, पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने हा उपक्रम राबवला. कार्यक्रमादरम्यान नागरिकांना हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती तसेच हेल्मेटचे वितरण करण्यात आले.