आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मिरज शहरात वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवणारा भव्य बालगोपाळ रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात हजारो बालवारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण मिरज नगरी भक्तिरसात न्हाऊन काढली.