वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे मौनी अमावस्येनिमित्त भरणाऱ्या खंडोबा महाराजांच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदाही या पारंपरिक यात्रा उत्सवासाठी विदर्भातील विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे.मेडशी येथील खंडोबा उत्सव समितीच्याने यात्रेचे नियोजन केले होते.पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी मोठी रिघ लागली आहे.भाविकांनी प्रथम खंडोबा महाराजांचे दर्शन घेतले,त्यानंतर बारी पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.