वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक वाढू लागली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच तुरीला समाधानकारक दर मिळत असून, तुरीचे दर प्रतिक्विंटल 8600 ते 8900 रुपयांवर गेले आहेत. नव्या तुरीची गुणवत्ता उत्तम असल्यामुळे खरेदीसाठी व्यापाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोयाबीननंतर तुरीच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.