वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांत तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी तुरीला प्रतिक्विंटल सुमारे ८५०० रुपयांचा दर मिळत होता. मात्र सध्या तुरीला केवळ ७८०० रुपये दर मिळत असून जवळपास ६०० ते ७०० रुपयांची घसरण झाली आहे.