वाशिम शहराला दररोज 70 ते 75 हजार लिटर डिझेल विक्री होते. मात्र काल वाशिम शहरात दोन लाख लिटर डिझेलची विक्री झाली आणि साठा संपला होता.ही परिस्थिती मागील दोन ते तीन दिवसापासून अशीच राहत आहे,ही परिस्थिती कॅनमध्ये डिझेल घेऊन जाणाऱ्यामुळे झाली असल्याचा आरोप पेट्रोल पंप असोसिएशनने केला आहे. यावर पर्याय शोधणे गरजेचे असल्याचे मत वाशिम अकोला पेट्रोल डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष जितेंद्र छाबडा यांनी व्यक्त केले आहे.