वाशिममध्ये ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात पार पडला. सकाळी ९:१५ वाजता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यात वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.