वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह आजूबाजूच्या परिसरात आज दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.