वाशिम जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. सर्व EVM स्ट्रॉंग रूममध्ये २१ डिसेंबरपर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. परिसर पूर्णपणे बंद असून २४ तास सीसीटीव्ही निगराणीखाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.