वाशिम जिल्ह्यात गहू-हरभरा पिकासाठी आवश्यक युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी सेवा केंद्रांकडून खत मिळत नसल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी संतप्त झाले असून, कृषी केंद्रांवर जाणीवपूर्वक टंचाई निर्माण केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाकडे तक्रारी दाखल करत आहेत.