वाशीमच्या मोहजा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना चक्क बोटीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.या शेतकऱ्यांचा पूर्वीचा रस्ता धरणात बुडाला आणि पर्यायी मार्ग इतर शेतकऱ्यांनी अडवला आहे. त्यामुळे नवीन रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज केला आहे. मात्र मागील वर्षभरापासून तहसीलदार यावर निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क ५० हजार रुपये खर्च करून बोट विकत घेतली. आणि आता तुडूंब भरलेल्या धरणातून जीव मुठीत धरून शेतात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.