मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे रखरखत्या उन्हात उपोषण करत असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समजूत घालत आहेत. आज सायंकाळपर्यंत चांगली गोड बातमी येईल असा मोठा दावा मंत्री संजय राठोड यांनी वाशिमच्या पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना केला आहे. बंजारा आरक्षणासंदर्भातही माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला असून तीन महिने हा आयोग राज्यभर फिरून सर्वांचे मते जाणून घेणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारकडे शिफारस करणार आहे अशीही माहिती जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.