वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान अतिवृष्टीमुळे ८९२ घरांचे नुकसान झाले. यापैकी ७०१ घरांना मदत मिळाली असली तरी, १९१ कुटुंबांना अद्यापही घरपडझड भरपाई मिळालेली नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही कुटुंबे तात्पुरत्या निवाऱ्यावर असून, तीव्र असंतोष आहे. तातडीने मदत न मिळाल्यास २६ तारखेला आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.