वाशिम-हिंगोली मार्गावरील रेल्वे गेटजवळच्या लोअर हाइट सबवेचे काम गेल्या सहा महिन्यांपासून थांबले आहे. उड्डाणपूल पूर्ण होऊनही सबवे रखडल्याने सुरकंडी, मोहगव्हाणसह अनेक गावांना मोठा फेरा घ्यावा लागतोय, ज्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे. काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.