गणेशपुरचे अल्प भूधारक शेतकरी गजानन सावके यांचे चिरंजीव डॉ.गोविंद सावके यांनी हे यश मिळवलं आहे. गोविंद सावके यांच्या आगमनानंतर शेलुबाजार परिसरात समाज बांधव आणि मित्रमंडळींनी गुलाल उधळत, फुलांचा वर्षाव करत भव्य मिरवणूक काढली.