वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी गावासाठी जलजीवन जल मिशन अंतर्गत 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले. मात्र अडीच महिन्यातच अनेक ठिकाणी ही पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून, गावातील नागरिकांना नाहक पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.