वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील चेहल येथे असलेल्या प्रसिद्ध नवश्या गणपती मंदिरात अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून, परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या मंदिराची ख्याती आहे, त्यामुळे केवळ मंगरुळपीर तालुक्यातूनच नव्हे, तर दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात.