वाशिमच्या मानोरा तालुक्यातील अनेक भागांना यंदाच्या तीव्र उष्णतेचा मोठा फटका संत्रा बागांना बसला आहे. मृग बहरासाठी ताणावर ठेवलेल्या बागांना वेळेत पाऊस न झाल्याने आणि तापमानात सातत्याने वाढ झाल्याने अनेक संत्रा बागा करपून गेल्या आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे.