वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सध्या वेग आला असून प्रचाराच्या नवनव्या पद्धती पाहायला मिळत आहेत. डिजिटल प्रचार, बॅनर-फ्लेक्स यांसोबतच आता ग्रामीण भागातील लोककलावंत आणि शाहीर प्रचाराच्या फळीत उतरले आहेत.लोककला, पोवाडे आणि शाहीरी गीतांच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार केला जात असून, यामुळे नागरिकांची करमणूक होत आहे तर प्रचारही अधिक प्रभावी ठरत आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून ग्रामीण भागातील कलावंतांना रोजगाराची संधी मिळत असल्याने प्रचारासोबतच उपजीविकेचा आधारही निर्माण होत असल्याचे चित्र सध्या वाशिममध्ये दिसून येत आहे.