वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारे जीर्ण झाल्याने व मसला पेन परिसरातील एका बंधाऱ्याची पडझड झाल्याने मोठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीस ते चाळीस वर्षांपूर्वी बांधलेले हे बंधारे धोकादायक बनले असून, पाणी साठवणूक होत नसल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.