वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरातील पपई उत्पादक शेतकरी यंदाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे संकटात आहेत. अतिवृष्टीने पपईच्या झाडांची वाढ खुंटली असून फळधारणाही अत्यल्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, लाखो रुपये खर्च करूनही उत्पादन हाती आले नाही. शासनाने पंचनामा करून तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.