वाशिम जिल्ह्यातील पिंपरी सरहद परिसरात उतावळी नदीच्या पुराने शेकडो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी एकनाथ भांदुर्गे यांच्यावर पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांचे सोयाबीनचे पीक दुसऱ्यांदा वाहून गेले आहे. तिसऱ्यांदा पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.