दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे विद्यार्थी एकता संघाच्या वतीने आक्रोश रॅली काढण्यात आली. पंचायत समिती कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली तहसील कार्यालयावर पोहोचली. रॅलीत विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, विद्यार्थी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.