वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत होते. दरम्यान आज रिसोड तालुक्यातील दापुरी आणि कारंजा शहरासह तालुक्यातील मनभा परिसरात पावसाचं आगमन झालं. या पावसामुळं सुकत चाललेल्या सोयाबीन, तूर, कपाशी आणि हळद या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.