मकर संक्रांतीच्या मातीच्या मडक्यांचा पुनर्वापर करून एस.एम.सी. स्कूल, वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेनेने वृक्ष संवर्धनाचा अभिनव उपक्रम राबवला आहे. झाडांच्या बुंध्याशी छिद्र असलेले मडके ठेवून वातीच्या साहाय्याने हळूहळू पाणी मुळांपर्यंत पोहोचते. यामुळे पाण्याची बचत होते आणि झाडांना दोन-तीन दिवस पुरेसे पाणी मिळते. हा पर्यावरणपूरक उपक्रम शेती व वृक्षसंवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त आहे.