वाशिमच्या रिसोड ते साखरा मार्गातील झिरो फाटा ते आगरवाडी पर्यंतच्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक खूपच त्रस्त झालेले आहेत. वारंवार मागण्या करूनसुद्धा शासन याकडे लक्ष देत नसल्याने आज आगरवाडी व परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.