वाशिम जिल्ह्यात यंदा हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे, मात्र काढणीच्या टप्प्यावर शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत.जिल्ह्यात हळद उकडण्यासाठी लागणाऱ्या बॉयलिंग कुकरची कमतरता सर्वत्र जाणवत असल्याचे चित्र आहे. त्यासोबत मजुरांची टंचाई आणि वाढते तापमान यामुळे काढणीचा वेग मंदावला आहे.त्यातच हवामानातील बदलामुळे अवकाळी पावसाची भीतीही शेतकऱ्यांना सतावत आहे. जर पाऊस झाला तर वाळवणी प्रक्रियेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत पडले आहेत.