वाशिम बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गट्टू हळद ₹१००० ने, तर कान्डी हळद ₹५०० ने घटली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही लक्षणीय घट शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे कारण ठरली आहे. नवीन आवक होण्यापूर्वीच दर घसरल्याने, भविष्यात दर आणखी कमी होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.