वाशिम जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ४४ अंशांच्या आसपास पोहोचला आहे. कडक उन्हामुळे विहिरी, नाले आणि इतर जलस्रोत झपाट्याने आटत असल्याने प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होत आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ २६ टक्के जलसाठा शिल्लक असून, त्यामुळे शहरात आठ ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्येही केवळ २०.८६ टक्के पाणीसाठा उरला आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अजूनही उन्हाळ्याचे दीड महिने बाकी असल्याने येत्या काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.