मनोरंजनाच्या जोडीला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे, महाराष्ट्रातील पहिले 'वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क' पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागात साकारण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात हे अनोखे थीम पार्क उभारले जात आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील टाकाऊ भंगार वस्तूंपासून या थीम पार्कमध्ये जगभरातील प्रसिद्ध 17 ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती तयार केल्या जात आहेत.