हिवाळ्यात उपलब्ध असलेला पाणीफळ शिंगाडा, म्हणजेच वॉटर चेस्टनट, आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे एक एनर्जी बूस्टर असून शरीरातील रक्त वाढवते, पचन सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच, त्वचेला आणि केसांना आतून चमक देऊन वजन कमी करण्यासही मदत करते. त्यामुळे शिंगाडा तुमच्या दैनंदिन आहारात अवश्य समाविष्ट करा.