बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाईने गंभीर रूप धारण केलं. मेहकर तालुक्यातील तब्बल 38 गावांमध्ये पाण्याची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. प्रशासनाने 38 विंधन विहिरी अधिग्रहित केल्या असून 7 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.