रायगडाच्या पायथ्याशी पाण्याचा हाहाकार पहायला मिळत आहे. हिरकणीवाडीत भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. या ठिकाणी पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. कारण गावात आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्याचे समोर आले आहे.