मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील सायन हायवे इथल्या सबवेच्या आत पाणी भरलं आहे. सायन हायवे जवळील एवरार्ड नगर इथल्या सबवेमध्ये पाणी तुंबल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या या ठिकाणी पंपाने पाणी काढण्यास सुरूवात झाली आहे.