बुलढाणा जिल्ह्यातल्या सोनोशी महसुल मंडळात काल अचानक वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार पावसाने बॅटिंग केली. तब्बल पाऊण तास पडलेल्या या पावसामुळे शेत कामगारांमध्ये तसेच शेतकऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे सोनोशी येथील नदीला पूर आला होता . दरम्यान पुलावरून पाणी वाहू लागल्याने राहेरी ते वर्दडी रोड दोन तास वाहतुकीसाठी बंद पडला होता. तर जांभोरा येथील पुलावरून सुद्धा पाणी वाहत होते, त्यामुळे रोडवर वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. तर शेतातून घरी येणारे शेतकरी , मजूर सुद्धा या पाण्यामुळे अडकून पडले होते. दोन्ही पुलावरचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.