मालेगाव तालुक्यातील तहानलेल्या माळमाथा परिसरातील २५ हून अधिक गावांना दर २० ते २२ दिवसांनी पिण्याचं पाणी मिळतं. दहिवाळ आणि २५ गावे पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला दहिवाळ गावाजवळ गळती होत आहे. ही गळती रोखताना पुन्हा विरूद्ध बाजूला गळती निदर्शनास आली. यामुळे मोठ्या प्रमाणत पाणी वाया जात आहे.