पंढरपूरमधील नीरेच्या खोऱ्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे नीरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. माळशिरस तालुक्यातील माळीनगर इथल्या नीरा नदी काठावरील घरांमध्ये रात्री नीरा नदीचं पाणी शिरलं. जवळपास 20 घरांमध्ये हे पाणी शिरलंय. नीरा नदीतून सध्या 30000 चा विसर्ग भीमा नदी पात्रात येत असल्याने भीमा नदी काठी पूर परिस्थिती निर्माण झाली.