धुळे शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. धुळे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. महापालिकेच्या वतीने योग्य साफसफाई झाली नसल्याने जिल्हा रुग्णालयाच्या आवाराला तलावाचं स्वरुप प्राप्त झालं आहे.