जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पहान गावासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे गावातील नव्याने बांधण्यात आलेलं तलाठी कार्यालय थेट पाण्याखाली गेलं आहे. कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण कार्यालयाला पाण्याचा वेढा पडला आहे.